घरी जाऊन् कटिंग करणार्‍या नाभिकांना 25 हजारांचा दंड, ‘इथं’ घेतला संघटनेनं निर्णय

रांची : वृत्तसंस्था – घरात अडकून पडलेल्या माणसांना नेहमीच्या सवयी बदलाव्या लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे बहुधा केस कापण्याबाबतही ‘आत्मनिर्भर’ व्हावं लागणार आहे. सध्यातरी महाराष्ट्रातल्या नागरिकांना नाही पण छत्तीसगडमधल्या राजनंदगावातल्या नागरिकांना तरी. छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्हा सलून संघटनेची बैठक झाली.

जे नाभिक घरी जाऊन केस कापताना सापडतील त्यांना 25 हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत झाला, अशी माहिती राजनंदगाव जिल्हा सलून संघटनेचे उपाध्यक्ष अशोककुमार सेन यांनी दिली. त्याउपर आणखीही एक नियम या संघटनेने केला आहे. त्या व्यक्तीला दंडासोबतच वाळीतही टाकण्यात येणार आहे. म्हणजे सर्व नाभिक मिळून त्या व्यावसायिकावर बहिष्कार टाकणार आहे. त्याला व्यवसाय करायला बंदी करण्यात येणार आहे.

50 दिवस घरी राहिल्यानंतर पहिल्यांदा घरातल्या लहान मुलांचे केस घरच्याघरीच कापण्याचा प्रकार लोकांनी केला पण आता थोरामोठ्यांनाही एकमेकांचे केस कापून आत्मनिर्भर व्हावे लागणार हाही कोरोना लॉकडाउनचा धडाच म्हणावा लागेल.