Solapur News : वृद्ध दाम्पत्याला लोअर बर्थ न देणं रेल्वेला पडलं महागात; कोर्टाने 3 लाखाचा दंड ठोठावला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याचा ११ वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याने केलेला छळ हे रेल्वे खात्याच्या अंगलट आले आहे. तर याप्रकरणावरून कर्नाटक न्यायालयाने भारतीय रेल्वेला तब्बल ३ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. तर २०१० रोजी एका ज्येष्ठ दाम्पत्याने रेल्वेचं थ्री टायर एसीचं तिकीट काढलं होतं. त्यांच्यापैकी एकजण अपंग होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कोटामधून त्यांचे बर्थ बुक केलं होतं. परंतु तरीही त्यांना एकही लोअर बर्थ मिळाला नाही.

तसेच त्या रेल्वेच्या डब्यात ६ लोअर बर्थ मोकळे होते, तरीही तिकीट अधिकाऱ्याने त्यांना एकही लोअर बर्थ उपलब्ध करून दिला नाही. त्या अधिकाऱ्याला सतत विनंती करून देखील सुद्धा त्याने या दाम्पत्याला सहकार्य केले नाही. तिकीट अधिकाऱ्याला असते करणं शक्य असताना सुद्धा त्याने जागा दिली नाही आणि तसे सहकार्य अनेक तिकीट अधिकारी /निरीक्षक करतातही. परंतु इथे तर त्याच डब्यात ६ लोअर बर्थ रिकामे होते म्हटल्यावर त्याने त्यांची व्यवस्था करायला हवी होती. मात्र त्याने केले नाही.

यादरम्यान, आणखी एक चूक रेल्वे खात्याकडून याच दाम्पत्याच्या संदर्भात झालीय. रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने या दाम्पत्याची दिशाभूल करून खोत सांगून त्यांना चुकीच्या रेल्वे स्टेशनवर उतरवल. त्या दांपत्याला जायचे असलेल्या ठिकाणापासून ते स्टेशन तब्बल १०० किलोमीटर लांब होत. तर या दाम्पत्याचा मुलगा त्यांना घेण्यासाठी बिरूर स्टेशनवर आला होता, मात्र हे दाम्पत्य पूर्वीच्याच असणाऱ्या स्टेशनवर उतरलेलं होतं. नेमका प्रकार काय आहे.

हा प्रकार कार्याला काही अवधी गेला. तसेच या सर्व सर्व प्रकरणावरून त्या ज्येष्ठ दाम्पत्याला शारीरिक आणि प्रचंड मानसिक त्रास झाला. तर त्यांच्या मुलालाही त्रास झाला. त्यामुळे त्या मुलाने भारतीय रेल्वे खात्याविरोधात तक्रार नोंदवून खटला दाखल केला. शेवटी ११ वर्षांनी का होईना मात्र त्या दाम्पत्याला न्याय नक्की मिळाला आहे. न्यायालयाने भारतीय रेल्वे खात्याला तब्बल ३ लाख रुपये संबंधित पीडित कुटुंबाला देण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच कायदेशीर प्रक्रियेचा खर्च म्हणून आणखी अडीच हजार रुपयेही देण्याचा आदेश देखील न्यायालयाने दिला आहे.