बाईकवरून जाताना पोलिसानं काठीनं मारलं, जाब विचारला तर केली मारहण

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, मास्कचा दंड आकारल्यानंतरही दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. अन्वर खाजाभाई तांबोळी असे मारहाण करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केईएम रुग्णालय जवळ विना ही घटना घडली.

विना मास्क व्यक्तीवर कारवाई करत असताना दुचाकीवरून जाणार्‍या अन्वर या वाहन चालकास पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी काठीने मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीने दुचाकीस्वार अन्वर घाबरला होता. त्यामुळे त्याने पोलिसांना जाब विचारला असता मास्क लावला नसल्याचे कारण देत संतापलेल्या पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी दुचाकीस्वाराला पाठीवर, कानावर, तसेच पायावर, मारहाण केली. त्यानंतर 500 रूपयाची दंडत्मक कारवाईही केली. दंडात्मक कारवाईकरुन सुद्धा मारहण झाल्याने तांबोळी यांनी पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे, पंरतु, या सर्व प्रकरणात पोलिसांकडून संबंधित तक्रारदारावर केवळ दंडात्मक़ कारवाई केली असून मारहाण झाली नसल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात न्याय मिळण्यासाठी वेळ प्रसंगी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावण्याची तयारी तक्रारदाराने केली आहे.