Fingernails | नखांचा रंग पाहून ओळखा आरोग्याची स्थिती, ‘हे’ 8 आजार जाळ्यात ओढू शकतात; जाणून घ्या कसे ओळखावे

0
412
Fingernails | fingernails show signs of illness disease health indicaton symptoms
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fingernails | शरीर अनेक आजारांचे संकेत देत असते. हे संकेत ओळखता आले तर वेळीचा उपचार करून तुम्ही मोठा धोका टाळू शकता. अशाच प्रकारे नखांच्या स्थितीवरून अनेक आजारांचे संकेत मिळू शकतात (colour and condition of the nails can indicate many diseases). नखांच्या या स्थिती कोणत्या ते जाणून घेवूयात. (Fingernails)

1. नखांची चमक जाणे, कोरडी, कमजोर होणे
वेबएमडीनुसार, जर नखाची चमक गेली आणि ती दिसण्यास कोरडी आणि कमजोर वाटू लागली तर थॉयरॉईडसारख्या समस्येने ग्रस्त असल्याचे हे लक्षण आहे. कोरडी आणि कमजोर नखे होण्याचे कारण फंगल इन्फेक्शन सुद्धा असू शकते.

2. जाड नखे
काही लोकांची नखे खुप जाड असतात जी कापण्यास खुप त्रास होतो. याकडे दुर्लक्ष करू नका. कारण नखे जाड होणे एक नव्हे तर अनेक आजारांचे लक्षण असू शकते. मधुमेह, फुफ्फुसात संसर्ग, अर्थरायटिस इत्यादीचे लक्षण असू शकते.

3. वक्राकार नखे
ज्या लोकांची नखे वक्र असतात त्यांना काही ना काही अनुवांशिक आजार, लीव्हरसंबंधी समस्या, हायपोक्रोमिक अ‍ॅनिमियाचा संकेत देणारा कायलोंनायचिया आजारसुद्धा असू शकतो.

4. पांढरे डाग, किंवा पांढरी नखे
जर नखावर पांढरे डाग किंवा संपूर्ण नखेच पांढरी झाली तर हे लक्षणे व्यक्तीच्या लीव्हर किंवा हृदयासंबंधी समस्यांचे असू शकते. तसेच जर नखांच्या किनार्‍यावर पांढर्‍या रंगाची लाइन दिसली तर व्यक्तीला तणाव शरीरात पोषणाच्या कमतरतेचा संकेत असू शकतो.

5. पिवळी नखे
पिवळ्या नखाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक फंगल संसर्ग आहे. संसर्ग वाढल्याने नखे जाडी होतात आणि निघू शकतात. दुर्मिळ प्रकरणात, पिवळी नखे जास्त गंभीर स्थितीचा संकेत देऊ शकतात जसे की गंभीर थायरॉईड रोग, काविळ, फुफ्फुसाचा आजार, डायबिटीज किंवा सोरायसिस.

6. निळ्या रंगाची नखे
निळ्या रंगाची नखे असतील तर याचा अर्थ आहे की, शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही.
हा फुफ्फुसाच्या समस्येचा संकेत असू शकतो. काही हृदयाच्या समस्यांमध्ये नखे निळी होऊ शकतात.

7. गडद रंगाची नखे
जर तुमच्या नखांचा रंग तपकिरी किंवा खुप गडद असेल तर थायरॉईड किंवा शरीरात पोषकतत्वांची कमतरता असू शकते.
नखांचा रंग लाल असणे ब्लड प्रेशरच्या समस्येचा संकेत असू शकतो. (Fingernails)

8. नखांची चमक जाणे
नखांची चमक जाणे, शरीरात पोषकतत्वांची कमतरता किंवा इन्फेक्शनकडे इशारा करते.
नखांमध्ये असे बदल दिसले तर डॉक्टरांकडे जा.

Web Title :- Fingernails | fingernails show signs of illness disease health indicaton symptoms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्या बारामती दौऱ्यात कोणता गौप्यस्फोट करणार?, चर्चांना उधाण

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,840 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Diabetes | मधुमेह ‘कंट्रोल’ करायचाय तर नाश्ता करताना अजिबात करू नका ‘ही’ चूक; जाणून घ्या