‘मेक इन इंडिया’ला बाधा आणणारे ‘गुंडाराज’ संपवा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

अमोल येलमार

‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’ला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील चाकण आणि तळेगाव एमआयडीसीमध्ये परदेशी कंपन्यानी मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र या कंपन्यामध्ये पाण्याचा ठेका ते ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’ स्वतःलाच मिळवण्यासाठी गावगुंडांनी तसेच माथाडीच्या नावाखाली अनेकांनी दहशत माजवली आहे. यामुळे गुंतवणूक केलेल्या परदेशी कंपन्यांच्या व्यवस्थापनामध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे ‘मेकइन इंडिया’ व ‘मेकइन महाराष्ट्र’ला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व गुंडांना संपवा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटिंग घेऊन दिले आहेत. या मिटींगला शहरातील आमदार उपस्थित होते. दरम्यान याच मागणी जर्मन काऊंसिल जनरल यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac69651f-c78b-11e8-9970-099b381cf317′]

‘मेकइन इंडिया व मेकइन महाराष्ट्र’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव एमआयडीसी आणि चाकण मध्ये मोठया प्रमाणात परदेशी कंपनीने गुंतवणूक करून ‘प्लँट’ उभा केले आहेत. लाखो करोडो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र कंपन्यांमधील ठेके मिळावेत यासाठी गुंडांनी दहशत सुरू केली आहे. एखादा ठेका दिला नाही तर गाव गुंडांकडून कामगारांना मारहाण, धमक्या दिल्या जात आहेत. यामुळेच पुणे ग्रामीण पोलिसांमधून या भागाचा समावेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आलेला आहे.

मुंबई स्थित जर्मन काऊंसिल जनरल डॉ. यूरगन मोरहार्ड हे नुकतेच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे आणि चाकण एमायडीसीमध्ये माथाडीच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी, टँकर माफिया, टेंडरसाठी होणारा त्रासाबाबत लवकर तोडगा काढण्याची मागणी डॉ. मोरहार्ड यांनी आयुक्त पद्मनाभन यांच्याकडे केली.

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष नको : आरएसएस

पिंपरी, भोसरी, चाकण व तळेगाव एमआयडीसीत सुमारे अनेक जर्मन कंपन्या आहेत. तसेच इतर परदेशी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपन्यांना मागील काही वर्षांपासून माफियांचा त्रास वाढला आहे. कंपनी प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. कंपनीला लागणारे पाणी, अकुशल कामगार, माथाडी, भंगार, कंत्राट यासाठी धमकावले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे विभाजन करून तळेगाव एमआयडीसी तर भोसरी पोलिस ठाण्याचे विभाजन करून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. तसेच या भागातील कंपनीच्या प्रमुखांनी तत्कालीन अति वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, हा त्रास कमी झालेला नसल्याचे येथील कार्यालयीन प्रमुखांनी परदेशात असलेल्या मुख्य कार्यालयाला कळविले होते.

चाकण भागात देखील विविध कंत्राटे मिळविण्यासाठी कंपनी व्यवस्थापाची अडवणूक केली जाते. चाकण, तळेगाव, पिंपरी व भोसरी एमआयडीसीत ठराविक व्यक्ती किंवा काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असलेल्यांनाच कंत्राटे द्यावीत यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कंत्राटावरून गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार यापूर्वी पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव पट्ट्यात घडले आहेत. त्याच बरोबर येथे काम करणाऱ्यांना देखील स्थानिक गुंडांचा त्रास होत असतो.

[amazon_link asins=’B073Q5R6VR,B074GY4DSL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca735e60-c78b-11e8-aaf0-2d440881e6c0′]

खासगी सुरक्षारक्षक नेमण्यासाठी देखील राजकीय पदाधिकाऱ्यांचे दबाव येत असल्याच्या तक्रारी काही कंपन्यांनी आपल्या मुख्य कार्यालयाकडे केल्या आहेत. सुरक्षारक्षकच जर गुंडगिरी करणाऱ्यांकडून नेमले गेले तर आम्ही कोणाच्या भरवश्यावर येथे काम करायचे असा सवाल देखील कंपनी प्रशासनाने पोलिस अधिकाऱ्यांकडे केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.

तळेगाव आणि चाकण एमआयडीसीमधील गुंडाराज संपविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबई येथे एक मिटिंग घेतली. या मिटिंगला पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आदी मंडळी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत येथील गुंडागर्दी संपवून परदेशी आणि तेथील गुंतवणूक दारांना विश्वास निर्माण करून देण्याचे आदेश दिले आहेत.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4bb5b88-c78b-11e8-b8e4-c32e07bc6915′]

याबाबत पोलिस आयुक्त पद्मनाभन यांना विचारले असता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तळेगाव आणि चाकण एमआयडीसीत गुंडाराज वाढल्याने मुख्यमंत्री आणि शहरातील आमदार यांची मिटिंग झाली असून त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष घालण्याचे सांगितले आहे. तसेच येथील भेडसावत असलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी मागणी डॉ. मोरहार्ड यांनी केली असून, त्यासाठी स्वतंत्र अॅक्शन प्लॅन आखण्यात आला असून लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पद्मनाभन यांनी सांगितले.