‘इथं’ मिळणार आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, दररोज फक्त 6 तास काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिनलँड सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील लोकांना आता दररोज केवळ 6 तास काम करावं लागणार आहे. याशिवाय त्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. फिनलँडच्या नव्या पंतप्रधान सना मरीन यांनी एक विधेयक सादर केलं आहे. यात याबाबत उल्लेख आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कर्मचारी आता कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकतील असं मरीन यांचं मत आहे.

एका रिपोर्टानुसार सना मरीन यांनी सांगितलं की, “लोकांना आपलं कुटुंब, नातेवाईक आणि आपल्या मनपसंतीचे काम करण्यासाठीअधिक वेळ मिळायला हवा. हे आपल्या कार्यकाळातील पुढील पाऊल असू शकते.” सना मरीन यांनी संसदेत हा प्रस्ताव सादर केल्यानंतर डाव्या आघाडीचे नेते आणि शिक्षणमंत्री ली एंडरसन यांनीही त्यांच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहे. जर लोकांना कमी काम करण्यासाठी परवानगी मिळाली तर लोकांची मदत होईल आणि मतदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण होईल असंही सना म्हणाल्या आहेत.

काही काळ मायक्रोसॉफ्ट, जपान आणि युकेची एक कंपनी पॉर्टकुलीस लीगलने देखील आठवड्यातून 3 दिवस सुट्टीची पॉलिसी तयारी केली होती. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला होता. इतकेच नाही तर कामच्या गुणवत्तेतही वाढ झाली होती. स्वीडन या देशात 2015 मध्ये 6 तास काम करण्याची पॉलिसी तयार केली होती. यानंतर तेथील कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला होता. यानंतर आता फिनलँडसाठीही तसे विधेयक सादर करण्यात आले आहेत. सध्या फिनलँडमधील कर्मचारी आठवड्यातून 5 दिवस 8 तास काम करतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/