Loan Moratorium : कर्जावर कर्जावरील व्याजाच्या सूटीबाबत सरकारनं जाहीर केल्या गाईडलाइन्स, तुमच्या अकाऊंटमध्ये परत येतील पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अर्थ मंत्रालयाने व्याजातून सूट मिळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. कोविड -19 च्या संकटामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत, सरकार दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सहा महिन्यांकरिता मुदत देण्याच्या कालावधीत एकत्रित व्याज म्हणजे व्याजावर व्याज आणि साधारण व्याज यातील फरक समान रक्कम देईल.

आरबीआयने दिलेल्या स्थगितीअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला 2 कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ योजना लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ही मार्गदर्शक सूचना आली आहे.

या लाभाचा कालावधी किती असेल?

वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कर्जदार संबंधित कर्ज खात्यावर योजनेचा लाभ घेऊ शकतात. हा फायदा 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीसाठी आहे. त्यानुसार ज्या कर्जदारांवर 29 फेब्रुवारीपर्यंत एकूण कर्ज 2 कोटींपेक्षा जास्त नाही, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

या कर्जावर मिळेल फायदा

या योजनेंतर्गत गृहनिर्माण कर्जे, शैक्षणिक कर्जे, क्रेडिट कार्डची थकबाकी, वाहन कर्जे, एमएसएमई (मायक्रो, लघु व मध्यम उद्योग), टिकाऊ ग्राहक सामानसाठी कर्ज आणि वापरासाठी कर्जे असतील.

कर्ज खात्यात पैसे परत केले जातील

मार्गदर्शक सूचनांनुसार, बँका आणि वित्तीय संस्था पात्र कर्जदारांच्या कर्ज खात्यात स्थगित अवधी दरम्यान व्याजावर व्याज आणि साधारण व्याजदरातील फरक ठेवतील. हे त्या पात्र कर्जदारांसाठी आहे, ज्यांनी रिझर्व्ह बँकेद्वारे 27 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या योजनेनुसार, संपूर्ण किंवा अंशतः कर्जमाफीसाठी देण्यात आलेल्या सूटचा फायदा घेतला.

आर्थिक संस्था संबंधित कर्जदाराच्या खात्यात पैसे टाकून त्याच्या देयसाठी केंद्र सरकारकडे दावा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय तिजोरीवर साडेसात हजार कोटी रुपयाचा भार येणार आहे.