सत्ताधारी शिवसेनेच्या 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी, पदाधिकार्‍याचं डोकच फुटलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमधील सातारा गावातील रस्त्याच्या निविदेवरून शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर आणि आमदार संजय क्षीरसाठ समर्थकांत वाद झाला. या वादानंतर सुशील खेडकर यांना आमदार क्षीरसाठ यांच्यासह उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांचे डोके फुटले होते.

आमदार संजय क्षीरसाठ आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मारहाण प्रकरणात आता या दोघांवरही वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्याच दोन गटामध्ये हा राडा झाल्याने जिल्ह्यामध्ये एकूणच पक्षाच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे. त्यामुळे आता पक्षाकडून वाद घालणाऱ्यांवर काही कारवाई केली जाते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वेदांतनगर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –