सदाभाऊ खोत यांच्यासह 8 जणांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये FIR

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज औरंगाबाद नाशिक राज्य महामार्गावर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले होते. लासलगाव पोलीस प्रशासनाने कलम 149 अन्वये आंदोलन करतांना नोटीस बजावण्यात साठी विंचूर येथे गेले असता आंदोलनकर्त्यांनी नोटीस न स्वीकारल्यामुळे आणि सामाजिक अतराचे पालन न केल्याने माजी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवनाथ जाधव ज्ञानेश्वर तासकर, सचिन दरेकर, धनंजय जोशी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्याद बंदी मागे घ्यावी व कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आज दिनांक 17/09/2020 रोजी विंचुर येथे आदोलन करण्यात आले. सामाजिक अतराचे पालन न करता , काही लोकांनी तोंडाला मास्क न लावता जमाव जमवुन कांदा उपबाजार आवार समोरील नाशिक औरंगाबाद प्रमुख राज्य महा मार्ग क्रमांक 2 वर येवुन रस्ता रोको केला. दिनांक 30/09/2020 रोजी पावेतो संपुर्ण नाशिक जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 1973चे कलम144(1)(3) अन्वये जमाय बंदीचे आदेश जारी केलेले असतांना कोव्हीड 19 संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही.

या प्रकरणी 143,341,188,259,270 व आपत्ती व्यवस्थापण 2005 चे कलम 51(ब) साथ रोग प्रतीबंधक अधिनीयम 1897 चे कलम 2,3,4 व महाराष्ट्र कोव्हीड 19 अधिनियमचे कलम 11 प्रमाणे सदाभाऊ खोत, शिवनाथ जाधव, ज्ञानेश्वर तासकर, बाबासाहेब पोटे, सचिन दरेकर, अनिल बोचरे, शंकर दरेकर, दिपक पगार, धनंजय जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.