पुरंदर मधील एका महिलेच्या विनयभंग प्रकरणी राजकीय पदाधिकार्‍यावर FIR

जेजुरी : पुरंदर तालुका ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते महेश उर्फ पप्पू मारुती राऊत, रा, सुपे खुर्द ता, पुरंदर यांच्यावर विनयभंग प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून स्वयंघोषित समित्यांच्या स्वयंघोषित पदाधिकारी आणि नेत्यांच्या कामकाजाबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की या घटनेतील आरोपी महेश राऊत तालुक्यात ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून मिरवत असून जमिनीच्या खरेदी विक्रीची कामे ते करीत आहेत.

दि. 14 /11 / 19 रोजी एक गावच्या कार्यालयात संघर्ष समितीच्या नावाने एक पत्र घेऊन गेले होते, त्यावेळी त्या ठिकाणी एक महिला कार्यरत होत्या, त्यांनी त्या लेटर हेड वर एक अर्ज लिहून संबंधित महिलेच्या दैनंदिन कामकाज व नोंदी बाबत कार्यालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यानंतर प्रांताधिकारी दौंड पुरंदर यांनी चौकशी करून सासवड येथील तहसील कार्यालयात वर्ग करून घेतले.

त्यानंतर आरोपी महेश राऊत हे वेळोवेळी महिलाचा पाठलाग करीत होते, तसेच माहिती अधिकार कायदा अंतर्गत वेळोवेळी माहिती मागवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, वरिष्ठांकडे वारंवार तक्रार अर्ज करून माझी बदनामी होण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये हेतु पूर्वक नकारात्मक बातमी लावली, त्यांना मानसिक त्रास होत असल्याने त्या दि. 5 / 3 / 2020 रोजी वैद्यकीय रजेवर गेल्या होत्या, तसेच मट कोर्टात न्याय मागितल्यावर कोर्टने पुन्हा संबंधित गावात रुजू केले.

दरम्यान तहसील कार्यालय येथे कामकाज करीत असताना दि. 11 / 8 / 2020 पासून आरोपी महेश राऊत हा वारंवार संबंधित महिलेचा पाठलाग करीत होता, तसेच त्यांच्याकडे अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता, त्यामुळे त्यांनी त्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चिखले अधिक तपास करीत आहेत.