बिग बॉस फेम अभिनेत्री पायल रोहतगी ‘गोत्यात’, मोतीलाल नेहरूंच्याबद्दल केलं होत आक्षेपार्ह विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिग बॉस फेम अभिनेत्री पायल रोहतगीच्या विरोधात राजस्थानमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पायल ने प्रसिद्ध स्वतंत्र सेनानी मोतीलाल नेहरू यांच्या विरोधात वादास्पद वक्तव्य केल्यामुळे एका स्थानिक युवा काँग्रेस कार्यकर्त्याने राजस्थानातील बुंदीमध्ये अभिनेत्रीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

पायल हिने पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पिता मोतीलाल नेहरू, त्यांची पत्नी आणि कमला नेहरू यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. एफआयआर दाखल करणाऱ्याने तक्रार केली आहे. की, या अभिनेत्रीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून नेहरू परिवाराबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे.

हे पहिल्यांदाच नाही की पायलने असे आपत्तीजनक वक्तव्य केले आहे. या आधीही पायलने अनेकदा अशाप्रकारची वक्तव्य केलेली आहेत. गेल्या जून महिन्यात पायलने छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील आक्षेपार्ह विधान केले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिच्यावर कारवाईची मागणी केली होती.

पायल विरोधात सोशल मीडियावरून संप्रदायिकी तनाव वाढवण्याच्या आरोपावरून मुबईमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आता तिच्या विरोधात नेहरू परिवाराबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याची तक्रार केली गेली आहे. युवा काँग्रेस नेता चर्मेश शर्मा ने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Visit : Policenama.com