home page top 1

कारवाईतील अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर FIR

वालीव (पालघर) : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपीला सोडून देत जप्त केलेले ‘हेरॉइन’ हा अंमली पदार्थ बळगल्या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस शिपाई व्हसकोटी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. तर निखील गिरीधर ठाकुर (वय-30 रा. मिरारोड पूर्व) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास यशवंत चौगुले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील ठाकुर याला एक महिन्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण आणि पोलीस शिपाई व्हसकोटी यांनी अटक करून पोलीस ठाण्यात आणले होते. त्याच्याकडून 85 हजार 500 रुपयांचे 14 ग्रॅम 940 मिली ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. विजय चव्हाण यांनी आरोपीवर कायदेशीर कारवाई न करता त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिले. तसेच त्याच्याकडून जप्त केलेले हेरॉइन, मोबाईल आणि ओळखपत्र स्वत:जवळ बाळगले. याप्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलीस शिपाई व्हसकोटी यांच्याकडून जप्त केलेले हेरॉइन जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोडून दिलेला आरोपी निखील ठाकूर याला अटक केली आहे. पुढील तपास वालीव पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like