खळबळजनक ! राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ आमदाराविरूध्द खूनाच्या प्रयत्नाचा FIR दाखल

सोलापूर (अकलूज) : पोलीसनामा ऑनलाइन – माळेवाडी-बोरगाव येथे हिंम्मतराव पाटील यांच्या बंगल्यावर असलेल्या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याला पळवून नेण्यासाठी हिंम्मतराव पाटील यांच्या बंगल्यात घुसून पिस्तूल रोखून सदस्य देण्याची मागणी उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या सोबतच्या 11 जणांनी केली. अकलूज पोलीस ठाण्यात आमदारांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना घटनास्थळावरून अटक केली असून बाकीचे सर्वजण पळून गेले आहेत. या घटनेमुळे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवारी (दि.29) रात्री साडे आठच्या सुमारास घडला.

कळंब पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केली असून मारहाण करणाऱ्या चौघांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणा यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे, दयाशंकर कंकाळ, पोपट चव्हाण यांच्यासह चार जणांना घटनास्थळावरून अटक केली आहे. आमदार राणा यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप असून त्यांच्यावर 307,323,504,452,427,143,148,149 या सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी हिंम्मतराव पाटील यांनी फिर्य़ाद दिली आहे. हिंम्मतराव पाटील हे उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काका आहेत.

अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, सतीश सत्यनारायण दंडनाईक, गणेश नारायण भातलवंडे, दयाशंकर गोपाळ कंकाळ, धीरज मुकुंद वीर, मनोगत उर्फ पिंचू शिनगारे, अरुण बंडोबा चौधरी, प्रणव विजेंद्र चव्हाण, दत्तात्रय बाळासाहेब साळुंके, मेघराज रावसाहेब देशमुख, पोपट ज्ञानोबा चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब पंचायत समितीचे सदस्य घरात ठेवल्याच्या आरोपातून राणा यांनी हिंम्मतराव पाटील घरी जाऊन गोंधळ घातला. त्यावेळी गावकरी जमा झाल्याने राणा हे त्यांची गाडी MH 12 PP 5511 यातून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/