पुण्यातील माजी आमदार विनायक निम्हण, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात FIR, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जागेच्या वादातून एका रिक्षा चालकाला माजी आमदार विनायक निम्हण आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक सन्नी निम्हण यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी चतु:श्रुगी पोलीस ठाण्यात संजय तुकाराम जगताप (वय 39, रा. कॉसमॉस बँकेशेजारी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक महादेव निम्हण आणि चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण (रा पाषाण) यांच्यावर भादवी कलम 324, 504, 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप आणि निम्हण यांच्यात जागेवरून वाद आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात (दि. 6 जुलै) बाणेर पाषाण रोडवरील स.न. 39/5 प्लॉट न. 62,63, 64 जवळ येथे कामगारांना चहा व नाश्ता देऊन बसले होते. त्यावेळी दोघे त्याठिकाणी लोखंडी हत्यार घेऊन आले. तसेच कामगारांना जागा काय तुमच्या बापाची आहे का असे म्हणून बोलत असताना फिर्यादी उठले. त्यावेळी सनी निम्हण याने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कामगार मध्ये पडला असता त्याला देखील मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून गेला. त्यानंतर दोघांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात गेले. उपचार घेऊन आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आद्यप कोणाला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत.