जेजुरी नगरपरिषदेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३७ / २०२०, पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अॅक्ट ३, भादंवि कलम ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची तक्रार राजेंद्र काळुराम जगताप (प्रधान तंत्रज्ञ – महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या. शाखा जेजुरी शहर) यांनी दिलेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेजुरी नगरपरिषदे मार्फत अंडर ग्राऊंड ड्रेनेज पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्याची वर्क ऑर्डर एस.आर. काळे (रा. पंढरपूर) यांची असून सदर काम त्यांचा मुलगा अजित शंकर काळे हा पाहत आहे. दि.२५ /०२/२०२० ते दि. ०१/ ०३/ २०२० या कालावधीमध्ये जे. सी. बी. क्रमांक (एम. ए. १२ , एस. ई. ७६९९) व्दारे जेजुरी शहरातील कोळविहीरे ए.जी. व जेजुरी शहर हद्दितील आयुश हॉटेल समोर, लेंडे किराणा दुकानासमोर, डॉ. भोईटे यांचे हॉस्पिटलसमोर, वैभव फर्निचर समोर तसेच कडेपठार कमानीसमोर महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या.चे मालकीची अंडर ग्राऊंड केबल वरील जे. सी. बी. च्या साहयाने तोडून विद्युत वितरण कंपनीचे एकूण ४,७४,७५०/ – रूपये चे नुकसान केले.

तक्रारदार यांनी १) अजित शंकर काळे (रा. पंढरपूर) , २) शिवराज सस्ते (रा .साकुर्डे, ता . पुरंदर, जि. पुणे), ३) जे. सी. बी. चालक राजपुरे (रा.कोळविहीरे , ता . पुरंदर , जि . पुणे) यांचे विरूध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गणेश दाभाडे हे करीत आहेत.