ऋषी कपूर आणि इरफान यांच्यावर अपमानास्पद ट्विट, ‘या’ अभिनेत्याविरूध्द FIR

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्यावर अपमानास्पद ट्विट केल्याने बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने विरोधात वांद्रे येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेना समिती सदस्य राहुल कनल यांनी केआरकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केआरकेने 30 एप्रिल रोजी ऋषि कपूर यांच्यावर अपमानास्पद ट्विट केल्याचा आरोप राहूल यांनी केला आहे.

दिवंगत अभिनेत्याविषयी अपमानास्पद ट्विट केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कमाल आर. खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून केआरकेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. केआरकेने ट्विटमध्ये, ‘ऋषी कपूर यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मी त्यांना इतकच सांगू इच्छितो की, सर लवकर बरे होऊन घरी परत या. निघून जाऊ नका, कारण 2-3 दिवसांमध्ये दारुची दुकाने उघडणार आहेत’ असे म्हटले होते. त्याच्या याच ट्विटवरुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटचे दोन दिवस फक्त बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण देशासाठी दु:खद होते. 29 आणि 30 एप्रिल रोजी बॉलिवूडमधील दोन कलाकारांनी जगाचा निरोप घेतला होता.

You might also like