सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दौंडमध्ये महिला वकीलावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील रावणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पकडलेल्या एका आरोपीला सोडविण्यासाठी एका महिला वकिलाने पोलीस उपनिरीक्षकांना फोन करून आणि नंतर पोलीस चौकीत जाऊन शिवीगाळ केल्याने दौंड पोलिसांनी या महिला वकीलावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दौंड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तेजस मधुकर मोहिते यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून वकील मयुरी काळे रा. रावणगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंड पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना रावणगाव येथे रम्मी नावाचा जुगार सुरू असल्याची खबर मिळाली होती दौंड पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी धाड टाकली असता रम्मी जुगार खेळणारे आरोपी व मुद्देमाल तेथे मिळून आला पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रावणगाव पोलीस चौकीत आणले असता ऍड. मयुरी काळे यांचा पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांना अगोदर फोन आला व त्यातील एक आरोपी प्रदीप काळे याला फोन दे मला त्याच्याशी बोलायचे आहे असे एकेरी भाषेत बोलून फोन दे नाहीतर मी चौकीला आले तर त्याचे परिणाम वाईट होतील असे म्हणत त्यांनी फोन कट केला व नंतर पोलीस चौकीत येऊन त्यांच्याशी हुज्जत घालून व शिवीगाळ करून तुझी वर्दी उतरवून टाकील असे म्हणत पोलिसांच्या सरकारी कामामध्ये सरकारी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खरात करत आहेत.

You might also like