मैत्रीचा गैरफायदा घेत अतिप्रसंग केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – समाजमाध्यमातील मैत्रीचा गैरफायदा घेऊन अतिप्रसंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणाला अटक केली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितल्यानुसार, आरोपीसोबत फेसबुकवरून माझी मैत्री झाली होती. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले होते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत आरोपी तरुणीला दक्षिण मुंबईतील लॉजवर घेऊन गेला, तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर त्याने मारहाणदेखील केली आणि परत लग्नास नकार कळवला. दरम्यान, तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, तपासकर्ते आरोपीचे फेसबुक अकाउंट तपासत आहेत. पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.