3000 रुपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलवर कारवाई न करता हॉटेल सुरु ठेवण्यासाठी 8 हजार रुपयाचा मासिक हप्ता आणि 3 हजार रुपयाची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत दगडू खताळ असे पोलीस हवालदाराचे नाव असून खताळ वणी पोलीस ठाण्यात कर्यरत आहेत. खताळ यांच्यावर वणी पोलीस ठाण्यात आज (शुक्रवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा हॉटेल व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या हॉटेलवर कारवाई न करण्यासाठी आणि हॉटेल चालू ठेवण्यासाठी वसंत खताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपयाचा मासिक हप्ता आणि 3 हजार रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी 26 फेब्रुवारी 2020 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. नाशिक लाचलुपच प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. यावेळी वसंत खताळ याने 3 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खताळ याच्याविरुद्ध आज वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत खताळ याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वणी पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.