फराह खान, रविना टंडन, भारती सिंह यांच्या अडचणीत ‘वाढ’, बीडनंतर अहमदनगरमध्ये FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बॅक बेंचर्स’ या कार्यक्रमात फराह खान, रविना टंडन, भारती सिंह यांनी ख्रिश्‍चन धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ख्रिश्‍चन समाजाने केली होती. त्यानुसार नगरमध्ये सिसील इझाक भक्त (वय 39, लाईड कॉलनी, सावेडी, नगर ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात त्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ख्रिश्‍चन धर्मीयांत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या शब्दाचा दि. 25 डिसेंबर 2019च्या बँक बेंचर्सच्या थेट प्रेक्षपणामध्ये डायरेक्टर फराह खान (रा.संजय प्लाझा, एबी नय्यर रोड, जुहू, नवी मुंबई, महाराष्ट्र), कॉमेडियन भारती सिंह व रविना टंडन (रा.निपुल सोसायटी, टंडन हाऊस, जुहू, मुंबई, महाराष्ट्र) यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला. तसेच विचित्र अंगविक्षेप केले.

भारती सिंह व रविना टंडन यांना दुसर्‍या फेरीमध्ये स्पेलिंग टेस्ट म्हणून पवित्र शब्दाची टिंगल टवाळी केली. यातून ख्रिश्‍चन समाजाच्या भावना दुखावल्याने फिर्यादीमध्ये सिसील इझाक भक्त (वय 39, लाईड कॉलनी, सावेडी, नगर ) यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/