हरियाणवी गायिका सपना चौधरीवर फसवणूकीचा आरोप, दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हरियाणवी सिंगर आणि डान्सर सपना चौधरीविरूद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार सपना चौधरी आणि इतरांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या आधारे सुमारे 4 कोटींच्या फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सपनाविरोधात 10 जानेवारीला दिल्लीतील ईडब्ल्यूडब्ल्यूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.

ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सपना चौधरीच्या स्टेज शोसाठी सपनाने पंकंज चावला आणि इतर काही पीआर कंपन्या व इतर कंपन्यांसमवेत स्टेज शो डान्स अँड सिंगिंग या करारावर स्वाक्षरी केली, त्या बदल्यात सपनाने अ‍ॅडव्हान्सही घेतले. पण स्टेज शोमध्ये परफॉर्मन्स केला नाही. असा आरोपही केला जात आहे की सपनाने लोनच्या नावाने अ‍ॅडव्हान्स घेतला, ज्याला मोबदलाही देण्यात आला नाही किंवा त्या बदल्यात स्टेज शोदेखील केला नाही. या तक्रारीनंतर सपना चौधरी आणि इतरांविरुद्ध आयपीसीच्या कलम 420, 120 आणि 406 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इकॉनॉमिक गुन्हे शाख लवकरच सपनाला नोटीस देईल आणि तिला चौकशीत सामील होण्यास सांगेल.

आधीही अडकली आहे सपना
सपना चौधरी विरोधात खटला दाखल करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही ती अनेक वेळा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. यापूर्वी 2019 मध्ये सपना चौधरीच्या भावाने एका कार्यक्रम आयोजकांवर पोलिस तक्रार दाखल केली होती. सपना चौधरी यांच्या थकबाकीबाबत त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. कार्यक्रमाच्या आयोजकांनी लुधियाना येथे एका कार्यक्रमासाठी 8 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी केवळ सहा लाख रुपये दिले म्हणून आपण पोलिसांकडे गेलो असल्याचे सपना चौधरीचा भाऊ विकास चौधरी यांनी सांगितले.

लग्नामुळे चर्चेत
सपना चौधरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने 2020 मध्ये हरियाणवी गायक आणि मॉडेल वीर साहूबरोबर गुप्तपणे लग्न केले. सपना आणि वीरचा एक मुलगा देखील आहे. अलीकडेच सपनाने लग्नाचा वाढदिवस साध्या पद्धतीने पती आणि मुलासमवेत साजरा केला. असे म्हटले जाते की सपना चौधरी ही वीर साहूशी जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती, पण कोणालाही याची माहिती नव्हती.

या दोघांच्या लग्नाची माहितीही जेव्हा वीरने मुलाची बातमी सोशल मीडियावर टाकली होती. यानंतर, करवाचौथच्या सेलिब्रेशनचे फोटो सपनाने शेअर केले होते. अशी माहिती आहे की सपना चौधरी तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. बिग बॉस या रि अॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला आणि देशभरात प्रसिद्ध झाली. सपनाची गाणी हिट असून तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.