शिवसेना-भाजपामधील संघर्ष टोकाला ! आमदारानंतर आता खासदारावर खूनाच्या प्रयत्नाचा FIR, सर्वत्र खळबळ

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील घटनेनंतर अकलूज पोलिसात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील सेना भाजप मधील संघर्ष चांगलाच उफाळून आल्याचे समजते. आमदार राणा पाटील यांच्यावर काल खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाल्यावर आज खासदार ओमराजेंवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कळंब पंचायती समितीचे सभापती या पदावरून दोन चुलत भावांमध्ये मोठा सत्ता संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले आहे. या राणा पाटील यांचे पंचायत समिती समर्थक सदस्य हे ओमराजे यांनी उचलून नेवून बोरगाव इथं हिम्मतराव पाटील यांच्या घरी नेवून ठेवल्याचा आरोप राणा पाटील केला. या सदस्यांना परत आणण्यासाठी गेलो असता आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिम्मतराव पाटील यांनी राणा पाटील यांच्यावर केला आहे.

खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील यांच्यासह 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काल गुन्हा नोंद झाला आहे. राणा पाटील यांनी हिम्मतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच 4 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या पंचायत समिती सभापती वरून हा वाद सुरू आहे त्याची निवड आज केली जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा