पालकमंत्र्यासह १६ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारे यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १६ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यवतमाळ न्यय दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांनी हे आदेश दिले आहेत. मदन येरावार आणि त्यांच्या इतर १६ जणांनी मिळून शहरातील मोक्याची जागा बनावट कागपत्रांच्या आधारे विकली होती.

जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे यांच्यासह बारा जणांनी मिळून जागेची खोटी कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे त्यांनी भूमिअभिलेख उपअधीक्षक, सहायक दुय्यम निबंधक यांच्या मदतीने तयार करून जागा पालकमंत्री मदन येरावार आणि अमित चोखानी यांना हस्तांतरीत केली. यामुळे आयुषी देशमुख यांनी पालकमंत्र्यांसह १६ जणांवर न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली.

न्यायालयाने यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावरा, भाजपा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चखानी तसेच तत्कालीन भूमिअभिलेख अधिकारी, तत्कालीन नगर परिषद सीईओ यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like