अभिनेता ऋतिक रोशनविरोधात फसवणुकीचा FIR

हैद्राबाद : वृत्तसंस्था – नुकतीच एक बातमी समोर आली आहे. अभिनेता ऋतिक रोशनच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, हैद्राबादमध्ये बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शशिकांत नावाच्या इसमाने ही तक्रार केली आहे. ऋतिकने लोकांना भटकवण्याचे काम केले आहे असा आरोप शशिकांतने केला आहे. अनेकांना माहिती असेल ऋतिक रोशन CULT FIT Health Care Private Limited चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. आता ऋतिक रोशनवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप ?
शशिकांतने ऋतिक रोशनवर आरोप केले आहेत की, ऋतिक तरुणांना भटकवण्याचे काम करत आहे. ऋतिक रोज लोकांना वर्कआऊट सेशन घेईन असा शब्द देत लोकांना जोडत आहे. परंतु काही दिवसांनंतर कोणेतेही वर्कआऊट सेशन घेतले जात नाही. सर्व वचनं आणि शब्द तसेच्या तसेच असतात. ऋतिक रोशन विरोधात तक्रार झाल्यानंतर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

‘त्या’ प्रकरणामुळे ऋतिक आधीही आला होता चर्चेत
याआधीही ऋतिक रोशन त्याची बहिण सुनैनाच्या प्रकरणावरून चर्चेत आला होता. ऋतिक रोशनची बहिण सुनैना हिचे मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध आहेत आणि म्हणूनच तिला कुटुंबियांनी मारहाण केली आहे असा धक्कादायक आरोप अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चांडोल हिने केला होता. यांसदर्भात ट्विट करत रंगोलीने यावर भाष्य केले होते. सुनैनाने अनेकदा मदतीसाठी कंगनाला कॉल केला आहे असेही तिने म्हटले होते.

रंगोलीच्या ट्विट नंतर ऋतिक चर्चेत आला होता. यानंतर आता ऋतिक फसवणुकीच्या तक्रारीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

आरोग्यविषयक बातम्या

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा