‘बिग बॉस 14’ मध्ये सर्वांना बोटावर नाचवणार कविता कौशिक, ‘वाईल्ड कार्ड’व्दारे करतेय एन्ट्री !

पोलीसनामा ऑनलाईन : मागील हंगामात म्हणजेच बिग बॉस 13 प्रमाणे निर्मात्यांनी 14 व्या हंगामाला यश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या हंगामात, पूर्वीच्या हंगामातील 3 लोकप्रिय स्पर्धक – सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांना आणण्यात आले होते, आता ‘एफआयआर’ फेम कविता कौशिक बिग बॉसच्या घरात एंट्री मारणार आहे. दरम्यान ‘बिग बॉस 14’ च्या पहिल्या आठवड्यातून सारा गुरपाल आणि आता कविता पूनिया, एजाज खान आणि शहजाद देओल बाहेर गेले आहेत. त्यांच्या एलिमिनेशननंतर आता बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

कविता कौशिकशिवाय या स्पर्धकांनासुद्धा वाईल्ड कार्ड एन्ट्री
आतापर्यंत वाईल्ड कार्ड स्पर्धक प्रवेशासाठी नयना सिंह, शार्दुल पंडित, रश्मी गुप्ता, प्रितीक सहजपाल आणि सपना सप्पु यांची नावे येत आहेत. दरम्यान माहितीनुसार कविता कौशिक या लोकांसमोर वाईल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश करणार आहे.

काही नवीन चेहरेही मारणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री
‘बिग बॉस 14’ साठी कविता कौशिकच्या नावाची चर्चा बर्‍याच दिवसांपासून होती, पण जेव्हा ती प्रीमियर एपिसोडवर दिसली नाही तेव्हा वाटले की ती ‘बिग बॉस 14’ चा भाग नाही, पण आता तिच्या शोमध्ये येण्याची जोरदार चर्चा आहे. आहे. कविता कौशिकने बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारण्याचा विचार केला होता. मात्र, याबद्दल कविता कौशिक कडून अद्याप कोणतेही विधान आले नाही. अहवालानुसार, वाइल्ड कार्ड एन्ट्रीशिवाय या महिन्याच्या शेवटी ‘बिग बॉस 14’ मध्ये स्पर्धक म्हणून आणखीन काही नवीन चेहरे दाखल होतील.

या चित्रपटांत आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसली कविता कौशिक
व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे झाल्यास कविता कौशिकने डझनभर टीव्ही मालिकांमध्ये काम केले, पण ‘एफआयआर’ च्या चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेमुळे तिला स्टारडम मिळाले. ‘जंजीर’, ‘एक हसीना थी’ आणि ‘मुंबई कटिंग’ यासह बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

You might also like