फसवणूक केल्याप्रकरणी तिघा बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध FIR दाखल

बांधकाम व्यवसायिक नितीन न्याती, नदीम परिहार व सलीम परिहारविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विकसनासााठी दिलेल्या भूखंडावर गृहप्रकल्प उभारुन ११ घरांऐवजी फक्त दोन घरांचा ताबा देवून उर्वरित घरे न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघा बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड धारकाला जातीवाचक शिवीगाळ करुन पट्टयाने मारहाण करीत डोक्याला पिस्तूल लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्याती डेव्हलपर्स, नदीम परिहार, सलीम परिहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी सुदेश बाबूलाल सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात महानगरपालिकेने १९९५ मध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी  भूखंड खरेदी केला होता. त्या भूखंडावर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना घरे बांधायची होती. मात्र, संबंधित सदस्यांकडे पैसे नसल्यामुळे हा भूखंड त्यांनी १९९६ मध्ये बांधकाम व्यवसायिक नितीन न्याती, बिलाल परिहार आणि निसार कादरखान पठाण यांच्याकडे विकसनासाठी दिला. करारानुसार तिघांनी ११ फ्लॅट मागासवर्गीय संस्थेला देणे बंधनकारक होते.

त्यासाठी २०१० मध्ये सारवान यांनी त्यांच्याकडे फ्लॅटची मागणी केली. त्यानुसार आरोपींनी दोन फ्लॅट त्यांच्या ताब्यात देत, गृहप्रकल्प पुर्ण झाल्यावर इतर फ्लॅट देण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर उर्वरित फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. नदीम परिहार, सलीम परिहार यांच्यसह न्याती डेव्हलपर्स यांनी टीपी संगमवाडी पुणे स्कीम फायनल प्लॉट क्रमांक ३०२ या जागेवर विकसन करार करून गृहप्रकल्प उभारला. त्यानंतर सारवान यांच्यासह ११ जणांना फ्लॅट न देता फसवणूक केली. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्वâ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

You might also like