मतदानाला फक्त 24 तास बाकी असताना राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याविरुद्ध FIR झाल्यानं ‘खळबळ’

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – महायुतीच्या उमेदवार व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध आक्षेपार्र्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा बहिणीतील संघर्ष शनिवारी प्रचार संपताना शिगेला पोहचला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही ही लढत वैयक्तिक पातळीवर नेत भावनिक आवाहन केले. धनंजय मुंडे यांनी सांगता सभेत आपल्याला बहिण पंकजा मुंडे या संपविण्याची भाषा करीत असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, माझी बहीण मला दृष्ट राक्षस म्हणते. मला संपवण्याची भाषा करते. मी असं काय केलंय असे भावुक भाषण धनंजय मुंडे यांनी केले.

याचवेळी धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह वक्तत्व असलेली एक भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.
दुसरीकडे परळीमधीलच महायुतीच्या सांगता सभेत पंकजा मुंडे या भावुक झाल्या. भाषण करता करता त्यांना भोवळ आली. त्यांना तातडीने रुग्णालया नेण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळेच पंकजा मुंडे यांना भोवळ आल्याचे सांगत त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरु केला.
त्यानंतर रात्री उशिरा परळी पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी खुलासा करुन ही क्लिप एडिट केलेली असल्याचा दावा केला आहे.

परळी विधानसभा मतदार संघात मुंडे बहिण भावातील लढत शिगेला पोहचली आहे. राज्यातील सर्वात काट्याची टक्कर येथे पहायला मिळत असल्याचा कयास आहे. त्यामुळे दोघांकडून ती भावनिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, मतदानाला 24 तास बाकी असताना FIR झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Image result for latest dhananjay munde

अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय मुंडे

शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी.

अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे.

मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित.

मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचे वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही. काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.

 

visit : Policenama.com