रविना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांना पुन्हा ‘धक्का’, तिघींच्या विरोधात बीडमध्ये FIR दाखल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – रविना टंडन, भारती सिंग आणि फिल्म मेकर फराह खान यांच्या विरोधात बीड शहरातील शिवाजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅक बेंचर्स या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या पवित्र ग्रंथ बायबालमधील हलेलूया या पवित्र शब्दाचा अश्लिल उच्चार करुन ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा गुन्हा दाखल केला. ख्रिश्चन समाजाकडून या तिघांना ही इशारा देण्यात आला आहे की माफी मागा अन्यथा घराबाहेर पडून देणार नाही. या तिघांना पोलीसांना तात्काळ अटक करावी अशी देखील त्यांची मागणी आहे.

रविना टंडनच्या माफीनामा –

रविना टंडन, फराह खान आणि भारती सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. या तिघांनी एका शोमध्ये ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. परंतु या प्रकरणानंतर आता रविना टंडन यांनी माफी मागत ट्विटरवर पोस्ट केली आहे.

रविनाने ट्विट केले की कृपया हा व्हिडिओ नक्की पाहा, मी एकदाही असा शब्द वापरला नाही ज्याने कोणाच्या धर्माचा अपमान होईल. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमच्या तिघांचाही प्रयत्न नव्हता. परंतु आमच्यामुळे कोणाला त्रास झाला असेल किंवा भावना दुखावल्या असतील तर मी त्या सर्वांची मनापासून माफी मागते. या पोस्टमध्ये तिने त्या शोच्या अ‍ॅपिसोडची लिंक देखील शेअर केली आहे.

रविना, फराह आणि भारती यांच्या विरोधात अमृतसरच्या अजनाला येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. एका वृत्तानुसार एका शोमध्ये या तिघींनी एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. या तिघींनी कॉमेडी शोमध्ये ख्रिस्ती धर्माबद्दल असे काही शब्द बोलले आहेत जे लोकांना आवडले नाहीत. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा अपमान केला आहे अशी तक्रार करण्यात आली आहे. विशेष काय, तर हा कार्यक्रम ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे या तिघांच्या प्रतिक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/