एल्गार परिषद प्रकरणात NIA कडून 11 जणांवर FIR, देशद्रोहाच कलम वगळलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषद प्रकरणात एनआयएने आज नव्याने एफआयआर दाखल केला आहे. एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एकूण 11 जणांची नावे असून त्यापैकी 9 जण सध्या तुरुंगात आहेत. या सर्वांवर दहशतवाद विरोधी कायदा यूपीए आणि भांदवी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, एनआयएच्या नव्या एफआयआरमध्ये संशितांविरोधात देशद्रोहाचं कलम लावण्यात आलेले नाही.

एल्गार परिषद प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज कोर्टात सनावणी झाली. यावेली एनआयए हे प्रकरण आपल्याकडे सोपवण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर 6 फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. एनआयएने दाखल केलेल्या 11 जणांवर एफआरआयमध्ये देशद्रोहाचे कलम लावण्यात आले नाही. पुणे पोलिसांना याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा होता. मात्र एनआयएच्या एफआरआयमध्ये या गुन्ह्याचा उल्लेखही करण्यात आलेला नसल्याचे
ॲड. सिद्धार्थ पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार हा राज्य सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे वर्ग केला. मात्र एनआयएकडे खटला वर्ग करण्यास राज्य सरकार उत्सुक नसल्याने या प्रकरणावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

एल्गार प्रकरणात सुरेंद्र गडलिंग, सुधा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, अरुण परेरा, व्हर्नन गोन्सालवीस, महेश राऊत हे सध्या कारागृहात आहेत. नक्षलवाद्यांशी संबंध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याच्या संशयावरून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पोलीस कारवाई वादग्रस्त ठरली असून, नव्याने स्थापन झालेले सरकार या प्रकरणाचा नव्याने शोध घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.