‘कोरोना’बाधितांची नावे उघड करणार्‍या ‘मनसे’च्या ‘शॅड्रो मंत्र्या’वर FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणुच्या संशयितांची नावे सोशल मिडियावर जाहीर करणार्‍या मनसेच्या शॅडो मंत्र्यावर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात एक तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे (रा. पौड रोड, पुणे) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. पाखरे यांनी कोरोनाच्या संशयित रुग्णांची नावे सोशल मिडियावर व्हायरल केली आणि त्यांची ओळख उघड केली होती.

दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसची तपासणी केंद्र या मथळ्याची पोस्ट भारत पवार ग्रुप क्रमांक ३ वर टाकली. याप्रकरणी पोस्ट व्हायरल करणारे तेजस जीभकाटे, रवींद्र चौबे, सचिन राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आदेशाचे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.