कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली 35 लाखाची खंडणी, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बी. टी. कवडे रस्ता परिसरातील एका इमारतीत राहण्यास आहे

याप्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आबाजी शिंदे व त्याच्या तीन साथीदारांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला आरोपींनी वारंवार भेटून तुम्हाला जीवे मारण्यास सुपारी दिली आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी ३५ लाख रुपयांची खंडणी मागून शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादी यांच्या मेव्हण्याला पिस्तूला सारखे हत्यार दाखवून पैशासाठी धमकाविले. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास मुंढवा पोलिस करत आहेत.