तबलिगी जमात संबंधित टान्झानियाच्या 8 नागरिकांवर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तबलिगी जमातीशी संबंधित असणार्‍या 8 टान्झानियाच्या नागरिकांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी परकीय नागरिक कायद्याचा तसेच क्वारंटाईनच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यातील कासेवाडी, मोमीनपुरा, घोरपडी, कोंढवा, हडपसर आणि खडकी येथील मशिदीमध्ये वास्तव्य केले होते. ते पुण्यात 11 मार्च 2020 पासून रहावयास आहेत. त्यांनी दिल्ली येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमास हजेरी लावलेली नव्हती. त्यांची कोरोना व्हायरसची टेस्ट घेण्यात आली असून त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याप्रकरणी विशेष शाखेचे पोलीस नाईक मयुर सूर्यवंशी यांनी समर्थ पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम 188 तसेच 269, 270, परकीय नागरिक कायदा 14, साथीचा रोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोवीड-19 अंमलबजावी कायदा कलम 21 नुसार गुन्हा दाखल केला आहे.