इंदुरीकर महाराजांची बदनामी करणार्‍यांविरूध्द पुण्यात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या वादग्रस्त किर्तनाने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आता पुण्यात सायबर पोलिसांकडे इंदुरीकर महाराजांची बदनामी केल्याबद्दल एका वकीलाने तक्रार दाखल केली आहे. इंदुरीकर महाराजांचे 8 जुलै 2018 रोजी पुण्यातील हडपसर परिसरात किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्या किर्तनाचे युट्यूबचे व्हिडिओ वापरुन औरंगाबादच्या तीन तरुणांनी इंदुरीकर महाराज्यांची बदनामी केल्याचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी तक्रार म्हणले आहे.

स्त्रीसंगवरुन सम-विषमचं गणित इंदुरीकर महाराजांनी मांडलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, “स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असे सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्यस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.”

परंतु हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप PCPNDT सल्लागार समितीच्या सदस्यांनी केला आहे. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. एवढेच नाही तर या नोटीशीनंतर पुरावे मिळाले तर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

गेल्या 26 वर्षांपासून मी किर्तन करतोय. या काळात घर कुटूंबापासून लांब राहिलो. रात्रंदिवस प्रवास करतो, हे सगळं मी लोकांसाठी केलं. एखाद्या किर्तनात एखादा शब्द चुकीचा गेला किंवा मी केलेलं वाक्य चुकीचंही नाही, परंतु मला त्रास दिला जातोय. यूट्यूबवाले काड्या करतात, यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र चॅनल संपतील पण मी संपणार नाही असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

You might also like