फसवणूक, कट रचणे आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी IPS अधिकार्‍यासह 5 जणांविरूध्द FIR दाखल

लखनऊ : वृत्तसंस्था – आयपीएस अजयपाल शर्माची पत्नी असल्याचा दावा करणार्‍या महिलेने त्यांच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये अन्य पोलीस कर्मचार्‍यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गृहविभागाचे विशेष सचिव अनिल कुमार सिंह यांच्या निर्देशानंतर हजरतगंज पोलिसांनी आयपीएस अजयपालच्या विरोधात फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली एफआईआर दाखल केली आहे.

दीप्ती शर्माने आरोप केला आहे की, तिचे पती अजयपाल शर्मा यांचे अफेयर होते. यासंदर्भात त्यांची तक्रार तिने पोलीस तसेच महिला आयोगाकडे केली होती, परंतु उलट अजयपाल शर्माने तिला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये पाठवले. पीडितेचा आरोप आहे की, आयपीएस अजयपाल शर्मा तिचा छळ करत होते. अजयपालने सहकार्‍यांसोबत मिळून सर्व पुरावे सुद्धा नष्ट केले. या प्रकरणाचा तपास आता गृहविभाग करत आहे. ज्यामध्ये रविवारी गृहविभागचे विशेष सचिव यांच्या निर्देशानंतर पत्नी दीप्ती शर्माने एफआयआर दाखल केली आहे.

माहितीनुसार, गाजियाबाद सिटी एसपी असताना अजयपाल शर्माने दीप्ती यांच्यासोबत 2016 मध्ये विवाह केला होता. यादरम्यान 19 अगस्त 2019 मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात अजयपाल शर्माने आपली पत्नी दीप्तीला जेलमध्ये टाकले. यादरम्यान लग्नाचे पुरावे नष्ट करण्यासाठी अजय पाल शर्माने आपल्या कर्मचार्‍यांना रामपुरहून पाठवले होते.

आयपीएस अजयपाल शर्माविरूद्ध त्याची पत्नी दीप्ती शर्माने एफआयआर दाखल केला आहे. गृह विभागाच्या निर्देशानंतर लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हे रजि. क्र. 101/20 मध्ये भादवि कलम 409, 201, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयपाल शर्मासह चार लोकांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये चंदन राय, एसएसआय विजय यादवसह अन्य पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.