अनुराग कश्यप, रामचंद्र गुहा, अपर्णा सेन, मणिरत्नम, यांच्यासह 49 जणांवर FIR, दाखल केला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

पाटणा : वृत्तसंस्था – देशातील समस्यांविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिणे आता या देशात अवघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगबाबत पत्र लिहिल्याने त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने चक्क ५० जणांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असून त्याची दखल घेत पोलिसांनीही तातडीने गुन्हा दखल केला आहे.

मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी हा आदेश दिला आहे. त्यामुळे देशातील समस्यांबाबत पंतप्रधानांना कळविणे हे आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरणार आहे. बिहारमधील वाढत्या मॉब लिंचिंगविषयी चिंता व्यक्त करणारे खुले पत्र रामचंद्र गुहा, मणिरत्नम, अपर्णा सेन अशा देशातील ५० प्रमुख मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. यावरुन देशभरात वादळ उठले होते. उजव्या विचारसरणीच्या व भाजपा समर्थकांनी त्यावर आक्षेप घेऊन यांना आताच असे प्रकार दिसू लागले का अशी विचारणा करुन त्यांच्यावर टिकेचा भडीमार करण्यात आला होता.

त्यावर येथील वकील सुधीर कुमार ओझा यांनी याचिका दाखल केली होती. २० ऑगस्टला न्यायालयाने ती दाखल करुन घेतली होती. ओझा यांनी आरोप केला होता की, या मान्यवरांनी देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात राष्ट्रद्रोह, उपद्रव करणे आणि शांतता भंग करण्याच्या हेतूने धार्मिक भावना दुखविण्याचा प्रयत्न करणे, अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गुरुवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यावर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.

visit : Policenama.com