पाळज येथील एकावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

पाळज येथील मानाचा गणपती महाराष्ट्रात नव्हे तर अनेक राज्यात नावलौकिक आहे. या गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित डेसीबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणा-या डॉल्बी (डीजे) धारकाला विचारणा करण्यासाठी भोकर पोलीस विभागाने नियुक्त केलेल्या पथकातील महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तणूक करणा-या पाळज येथील एका इसमा विरुद्ध शासकिय कामात अडथळा व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.उच्च न्यायालय व जिल्हादंडाधिकारी यांनी घालून दिलेल्या बंदी आदेश पायदळी तुडवून काही मंडळे डाॅल्बी(डी.जे.) चा सरास वापर करुन श्री गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूकीत निर्धारित डेसीबलपेक्षा जास्त आवाजात डी जे वाजवून ध्वनी प्रदूषण करणा-या विना परवाना डी.जे.च्या ध्वनी क्षेपण क्षमतेची मोजणी व कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने पथके नियुक्त केली होती. याच अनुशंगाने भोकर पोलीस विभागाने नियुक्त केलेल्या अशाच पथकातील महिला अधिकारी,पो.काॅ.इंगोले,पो.काॅ.शिरोळे व एक होमगार्ड यांना दि.२३ सप्टेंबर २०१८ रोजी पाळज गणेश मंडळ येथे भव्य विसर्जन मिरणुकीत कर्तव्यावर असतांना माै.पाळज ता.भोकर येथे सुरु असलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीत काही मंडळांनी बंदी असतांनाही डी.जे. लावल्याचे निदर्शनास आल्याने रात्री आठ वाजताच्या दरम्यान ही मिरवणूक पवन चटलावार (वय ४०) यांच्या घरासमोर आली असता महिला अधिकारी . व पथकातील कर्मचा-यांनी बजरंग दल युथ गणेश मंडळाने लावलेल्या डी.जे.ची ध्वनी क्षमता डेसिबल मिटरने मोजण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील एका इसमाने ती ध्वनी प्रक्षेपण क्षमता मोजू नये म्हणून यांच्याशी हुज्जत घातली. तसेच मोजण्यास विरोध केला व कर्तव्य सेवा बजावत असलेल्या या महिला अधिका-यांच्या कमरेवर हात लाऊन वाईट हेतूने गैर वर्तणूक केली.यावेळी समज घालण्याचा प्रयत्न करत असलेल्या कर्मचा-यांना ही तुमच्याने काय होते ते करुन घ्या म्हणत धमकी दिली व शिवीगाळ केली. त्यावेळी सदरील इसमास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याचे नाव प्रविण विठ्ठलराव चटलावार (४०) रा.पाळज ता.भोकर जिल्हा नांदेड असल्याचे समजले.

उदयनराजे तातडीने पुण्याला; पण शरद पवारांचा “सब्र करो” चा इशारा
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32ac89cc-c08d-11e8-8f1c-754dc9b3562c’]

दौंड : खून प्रकरणातील फिर्यादीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीची नासधूस

कर्तव्यावर असलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून गैर कृत्य करणा-या प्रविण विठ्ठलराव चटलावार,रा.पाळज यांच्या विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षापासून एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेल्या महिला अधिकारी (वय वर्षे २९) यांनी फिर्याद दिल्यावरुन दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी शासकिय कामात अडथळा करुन विनयभंग केला व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रविण चटलावार यास अटक करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर न २७२/२०१८ /३५३ , ३५४ ,५०४ ,५०६ ,भांदवी कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास पो.नि.आर.एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन व जमादार संभाजी हनवते हे पुढील अधिक तपास करत आहेत. पाळज येथे अशाच प्रकारचे गैर कृत्य झाले होते. त्यावेळी काही सुज्ञ नागरीकांच्या मध्यस्थीने समजूत घालून ते प्रकरण पमिटविले होते.

[amazon_link asins=’B06XFLY878,B00Y6EHHQ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a86d003-c090-11e8-8519-ef6be3f2ea89′]

यावर्षी देखील ७० वर्षाची गणेश स्थापनेची ऐतिहासीक परंपरा गाजलेल्या पाळज देवस्थान असलेल्या गावात असे गैर कृत्य झाल्याने सदरील इसमाने पाळज या गावच्या नावलाैकीकतेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. असे चर्चील्या जात असून हे प्रकरण मिटविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पोलीस खात्यातील एका कर्तव्यदक्ष महिला अधिका-यांसोबत जर असा गंभीर प्रकार होत असेल तर इतरांच्या सुरक्षीततेची काय हमी? पोलीस प्रशासन व शासन या आरोपी स कठोर शिक्षा करेल का या गोष्टी कडे सर्व युवकांचे व पाळज करांचे लक्ष आहे.

बंदोबस्तातील ५ हजार पोलिसांसाठी जेवणाची व्यवस्था !

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0f5e41a-c08e-11e8-8dee-75c745d59956′]