‘अंडरवर्ल्ड’ डॉन छोटा शकीलच्या विरूध्द FIR दाखल, बड्या नेत्याच्या हत्येचं होतं ‘प्लॅनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरनुसार पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे की, छोटा शकील हा दिल्लीतील बड्या आणि प्रमुख नेत्यांना ठार मारण्याचा कट रचत आहे, तसेच काही मोठ्या न्यायाधीशांवर देखील त्याचा निशाणा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसचे कमिश्नर या प्रकरणावर नजर ठेवून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, छोटा शकीलकडून या हत्यांचा संकेत मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक बड्या नेत्यांना सतर्क केले आहे.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘डी कंपनीने या कामासाठी आपल्या माणसांना अत्याधुनिक शस्त्रेही उपलब्ध करून दिली आहेत. शस्त्राचे वितरण छोटा शकील याने त्याच्या माणसांकडून केले आहे. या माहितीच्या आधारे स्पेशल सेलने १२०बी आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.’

दिल्ली पोलिसांना असे काही पुरावे मिळाले आहेत की दाऊद इब्राहिम दिल्लीतील अनेक बड्या नेत्यांना आणि न्यायिक क्षेत्राशी संबंधित बड्या व्यक्तींना ठार मारण्याचा कट रचत आहे. डी कंपनीच्या या योजनेवर काम करण्याची जबाबदारी छोटा शकील याला देण्यात आली आहे.