‘फायर ब्रिगेड’च्या NOC शिवाय चालतं देशातील सर्वात मोठं AIIMS हॉस्पीटल ! आग लागल्याने ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सगळ्यात मोठ्या असलेल्या दिल्लीतील AIIMS दवाखान्याकडे अग्निशामक दलाची एन ओ सी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दवाखान्याला लागलेल्या आगीमुळे अग्निशामक दलाने या याबाबतचा खुलासा केला आहे.

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एम्सच्या ज्या भागात आग लागली त्या भागासाठीची एन ओ सी रुग्णालयाकडून घेण्यात आलेली नाही. अग्निशामक दलाचे म्हणणे आहे की रुग्णालयाची इमारत खूप जुनी आहे आणि दर तीन वर्षांनी एन ओ सी करून घेणे गरजेचे असते मात्र रुग्णालयाकडे कसलीही एन ओ सी नाही.

शॉर्ट सर्किटमुळे लॅबमध्ये पसरली आग –
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ती लॅब मध्ये पसरली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे लॅब शेजारी असलेले एमर्जन्सी वॉर्ड तात्काळ बंद करून तेथील रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं.

विशेष म्हणजे आग लागलेल्या ठिकाणाहून जवळच ५०० मीटरच्या अंतरावर केंद्रीय मंत्री अरुण जेटली आहेत आणि त्या ठिकाणी सतत व्हीआयपी लोकांचं येन जाण सुरु होत.

हलगर्जीपणावर होणार कारवाई –
या संधर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी आज दिल्ली पोलिसांना सविस्तर रिपोर्ट देणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –