महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्यावर आचारसंहिता भंगचा FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमधील राजकीय उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे.. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार एड. गौतम चाबुकस्वार आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महायुतीचे पिंपरी मतदार संघाचे उमेदवार चाबुकस्वार यांच्या प्रचारासाठी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आकुर्डी गावातून पदयात्रेचे आयोजन केले होते. सुमारे 100 ते 125 कार्यकर्ते जमा करून पदयात्रा काढण्यात आली. त्यासाठी कुटे यांनी पोलिसांकडून परवानगी घेतली नाही. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आमदार चाबुकस्वार आणि नगरसेवक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यावर उशीर झाल्यामुळे परवाना काढणे शक्य झाले नाही, असे कारण आमदार चाबुकस्वार यांनी पोलिसांना सांगितले.

visit : policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like