गुरुपौर्णिमा उत्सवात 500 जण एकत्र येऊन लॉकडाऊन नियमांचा फज्जा, पोलिसांकडून 40 जणांवर FIR

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने 450 ते 500 एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला पण यामध्ये लॉकडाऊन च्या नियमांचा फज्जा उडाल्या चे समोर आले आहे . कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमानुसार धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. देशात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारन धार्मिक कार्यक्रम विविध प्रकारचे सण रद्द करण्यात आले . पंढरपूर ची आषाढी वारी सुद्धा सरकारी नियमानुसार साध्या पद्धतीने साजरी केली गेली.

वाद्यांचा गजर, मिरवणूक आणि मग सर्वांसमोर महाराज काट्यांवर पाठ टेकून झोपले. यानंतर गुरूदक्षिणेत झोळी भरून पैसे स्वीकारले. शिरुर तालुक्यातील चिंचणी गावात कोरोना काळात अशी गुरूपौर्णिमा झाली आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. चिंचणी येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर असून या मंदिरात तात्यासाहेब पवार हे महाराज काट्यांमध्ये झोपणे तसेच काचेच्या बाटल्यांवर चालणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम गेल्या 40 वर्षापासून गुरु पौर्णिमेला करत असतात. त्यानंतर देवाच्या पालखीची दिंडी काढली जाते. शेवटी देवाची आरती घेतल्यानंतर जेवणाच्या पंगती सुरू असताना महाराज पंगतीमधून फिरत भिक्षा मागतात. यावेळी झोळीत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दक्षिणा टाकली जाते.

अहमदनगर ,चाकण ,पिंपरी चिंचवड , येथुन लोक कार्यक्रमास सहभागी झाले. गुरुपौर्णिमा निमित्त दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात परंतु यावर्षी शासनाच्या नियमानुसार कुठलेही धार्मिक कार्यक्रमास बंदी घातली असताना कार्यक्रम घेऊन गावाला कोरोनाचे आमंत्रण देण्याचा प्रकार घडला आहे या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील भाजप आमदाराची चारचाकी वाहन आढळून आले कोरोना वाढता प्रादुर्भाव याचं आमदार ना सुद्धा कसलं गांभीर्य नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाअधिकारी पुणे यांच्या आदेशा नुसार संपुर्ण पुणे जिल्हात , नागरिकांनी तोंडाला माॕस्क लावणे , विनाकारण जमाव न जमविणे , राजकीय , धार्मिक कार्यक्रम न करणे अशा पध्दतीच्या अटी असतानेही शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे अनिल माणिक पवार, आकाश संभाजी पवार,अमोल सोनबा पवार, दत्ताञय पांडुरंग पठारे , श्रीकांत हिरामण पवार , प्रेमराज भगवान खुले, गोरख शिवाजी पवार. राजेंन्द्र आबासाहेब पवार , अनिल सुभेदार पवार , लक्ष्मण बाबासाहेब पवार , संभाजी बाबासाहेब पवार सर्व रा.चिंचणी व इतर 30-35 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून , तोंडाला माॕस्क न लावता , मा.जिल्हा अधिकारी साहेब पुणे यांच्या आदेशाचा भंग केल्याने वरील सर्वांवर शिरूर पोलिस ठाण्यात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मा.पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे साहेब यांच्या वतीने सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की सद्य घडीला कोरोना साथीमुळे शासन आदेशा नुसार फक्त अंतिम संस्कार व लग्नसोहळ्यासाठीच मर्यादित नागरिकांच्या उपस्थित हे दोन विधी करता येतील , धार्मिक सोहळे , राजकीय मेळावे किंवा स्नेहमेळावे , एकञित जेवणावळी अशा सर्व कार्यक्रमावर बंदी असून कुणीही शासन आदेशाचा भंग केला तर त्या इसमावर कठोर कारवाई केली जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like