पुण्यात अमेरिकन महिलेवर FIR, मुस्लिम असल्याने केली डॉक्टर महिलेला शिवीगाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात मोठ्या प्रमाणावर जातीवाद, धर्माधर्मा विषयी राग असल्याचे नेहमीच दिसून येते. पण अमेरिकन लोकही मुस्लिमांचा किती राग राग करतात याचा प्रत्यय कॅम्पमधील क्लोअर सेंटर येथे दिसून आला. लष्कर पोलिसांनी एका अमेरिकन महिलेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या व असलेल्या मुस्लिमांची इतरांपेक्षा अधिक कडक तपासणी होते. मुस्लिमाकडे संशयाने पाहिले जाते. अगदी बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुखान यांनाही त्याचा अनुभव अमेरिकन विमानतळावर आला होता. मात्र, अमेरिकन महिलेने समोरची व्यक्ती केवळ मुस्लिम आहे, म्हणून राग राग केल्याची पहिलीच घटना पुण्यात आढळून आली आहे. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या डॉक्टर महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरुन लुईस जॅमी लायन या अमेरिकन महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

या रविवारी दुपारी क्लोअर सेंटरमधील मॉलमध्ये गेल्या होत्या. त्या जिन्यावरुन खाली येत असताना एका महिलेने त्यांना विचारले की तुम्ही मुस्लिम आहात का असे इंग्रजीत विचारले. त्यावर त्यांनी हो असे उत्तर दिले. त्यांचे उत्तर ऐकल्यावर ही अमेरिकन महिला खवळली व तिने शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली. लाथ मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने या डॉक्टर महिला गडबडून गेल्या. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या अमेरिकन महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली व तिला ताकीद दिली.

आरोग्यविषयक वृत्त