पुणे : FIR On Amit Anil Lalwani | गुलटेकडी येथील पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) मुठा उजवा कालव्याच्या (Mutha Ujwa Kalwa) सुरक्षितेसाठी बांधलेली सीमा भिंत पाडून बिल्डरने बांधकामासाठी लागणारे साहित्याची वाहतूक करण्यासाठी सिमेंटचा कॉक्रीटचा रस्ता तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बिम्स अँड शाईन रिअल्टीजचे (Beams & Shine Realties Private Limited) अमित अनिल ललवाणी (Amit Anil Lalwani) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी रोहन ढमाले यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिम्स अँड शाईन रिअल्टीज या कंपनीकडून अमित ललवाणी यांनी अप्सरा टॉकीजसमोरील सर्वे नं. ७२९ /१/अ गुलटेकडी (Gultekdi Irrigation Department Office) येथील जागेवर बांधकाम करण्याकरीता शासनाच्या जागेचा वापर करण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अर्ज केला होता.
त्यानुसार वरिष्ठांनी पाहणी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश फिर्यादी यांना दिला होता.
फिर्यादी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता ललवाणी याने त्यांच्या प्लॅटवर जाण्यासाठी मुठा उजवा कालव्या लगत अंदाजे १२मीटर रुंद व ३०० मीटर लांब अंतराचा सिमेंट कॉक्रीटचा पक्का रस्ता तयार केला होता.
पाटबंधारे विभागाने कालव्याच्या सुरक्षिततेसाठी बांधलेल्या सीमा भिंतीपैकी ६३ मीटर लांब, ५ मीटर उंच व ०़३० मीटर रुंदीची भिंत पाडून २ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान केले.
त्या जागेतून विना परवानगीने बेकायदेशीररित्या प्रवेश करुन बांधकामास लागणारे साहित्याची वाहतूक करीत
असल्याचे दिसून आले. तसा अहवाल फिर्यादी यांनी वरिष्ठांना सादर केला.
त्याबाबत सांगितल्यानंतरही त्यांनी बेकायदेशीरपणे वाहतूक चालू ठेवल्याने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील (PSI Ashok Patil) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा
Prasad Gosavi Passes Away | ‘पोलीसनामा’चे वरिष्ठ बातमीदार प्रसाद गोसावी यांचे निधन
Shivsena UBT On Ajit Pawar | ‘अजित पवारांवर कसला दबाव?’, शिवसेना ठाकरे गटाने डिवचलं,
म्हणाले – ” आधी भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स लागायचे, आता…”