25 हजाराची लाच प्रकरण : सहाय्यक अभियंत्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मीटर देण्यासाठी तसेच प्रलंबित फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील रघुनाथ कांदे (वय 40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. चातुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील 48 वर्षीय तक्रारदार मीटर बसविण्याचे कामे करतात. दरम्यान त्यांनी बाणेर परिसरात शॉपमध्ये मीटर बसविण्याचे काम घेतले होते. याबाबत त्यांनी बाणेर महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी लागणारे विद्युत मीटर देण्यासाठी आणि प्रलंबित फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे लोकसेवक कांदे यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत त्यांनी पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कांदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.