×
Homeक्राईम स्टोरीFIR On Karuna Sharma In Pune | करुणा शर्मा यांच्यावर महिलेकडून अ‍ॅट्रोसिटीचा...

FIR On Karuna Sharma In Pune | करुणा शर्मा यांच्यावर महिलेकडून अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; पतीबरोबर अनैतिक संबंध ठेवून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR On Karuna Sharma In Pune | करुणा शर्मा मुंडे (Karuna Sharma Munde) यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही काळापूर्वी करुणा शर्मा यांच्या सोबतचे नाते सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंढे (Dhananjay Munde) यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर करुणा शर्मा सातत्याने चर्चेत आहेत. आता करुणा शर्मा यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा (Atrocity Case) दाखल झाला आहे. (FIR On Karuna Sharma In Pune)

 

पुण्यातील येरवडा (Yerwada) येथील एका 23 वर्षाच्या महिलेने करुणा शर्मा यांच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे. या महिलेचा पती व करुणा शर्मा यांच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती उस्मानाबाद येथे वास्तव्य करत होते. त्यांना एक मुलगी आहे. नोव्हेबर 2011 मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. यानंतर फिर्यादी महिलेचा पती वारंवार त्यांच्या घरी जाऊन राहू लागला. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पती सतत करुणा शर्मा यांच्याशी बोलत असे. महिलेने याबाबत पतीला विचारले असता त्याने करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. (FIR On Karuna Sharma In Pune)

महिलेने फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, या प्रकरणावरून नंतर पती छळ करु लागला. मी करुणाबरोबर लग्न करणार आहे. तू मला घटस्फोट दे, असे सांगून पतीने मला आईच्या घरी सोडले. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2022 रोजी घरी येऊन फिर्यादीवर पतीने बळजबरी केली.

 

24 एप्रिल रोजी तिला कार्यक्रमाला जायचे असे सांगून भोसरीला नेले. तेथे करुणा शर्मा हिने हॉकी स्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

 

फिर्यादी महिला पतीच्या शोधासाठी 3 जून रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथील ग्रीन इमारतीत करुणा शर्मा यांच्या घरी गेली.
या ठिकाणी पतीने करुणा शर्मा यांना फोन लावला.
यानंतर करुणा शर्मा यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करुन पतीला घटस्फोट दे,
नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिली.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav) करत आहेत.

 

Web Title :- FIR On Karuna Sharma In Pune | Karuna Sharma Munde charged with atrocity by a woman;
Accused of racial slurs by having immoral relationship with husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News