FIR On Ketaki Chitale In Pune | शरद पवारांवरील पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात पुण्यात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR On Ketaki Chitale In Pune | मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला होता. याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच आज केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांची ही कारवाई सुरू असतानाच तिच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक करत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, आता पुण्यातही केतकीविरूद्ध सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police Station) तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी FIR दाखल केली आहे. (FIR On Ketaki Chitale In Pune)

 

ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR On Ketaki Chitale In Pune)

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, समीर शेख, उदय महाले, गणेश नलावडे, प्रीती धोत्रे व अ‍ॅड. विकास शिंदे आदींनी पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे.
या कवितेच्या माध्यमातून तिने पवार यांच्यावर अतिशय असभ्य भाषेत टीका केली आहे.
केतकीने शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते
आणि कार्यकर्ते संतप्त झाले असून अनेकांनी सोशल मीडियावर तिचा निषेध केला आहे.

 

राजकीय वर्तुळातून सुद्धा तिच्यावर टीका होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली आहे.

 

दरम्यान, ठाणे पोलिस केतकी चितळेला ताब्यात घेत असताना कळंबोली पोलिस स्टेशनच्या बाहेर
केतकीवर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली.
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी, केतकी हाय हाय, च्या घोषणा दिल्या. ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली आहे.

 

Web Title :- FIR On Ketaki Chitale In Pune | FIR against actress ketaki chitale after she posted controversial poetry on social media pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा