FIR On Manish Sisodia | मनीष सिसोदिया आरोपी नंबर 1, दिल्लीतील दारू घोटाळ्यात ‘हे’ आहेत 15 जण, जाणून घ्या आत्तापर्यंतच्या A To Z अपडेट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – FIR On Manish Sisodia | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी तब्बल 14 तास छापेमारी केली. शुक्रवारी सकाळी सुरू झालेला सीबीआयचा छापा रात्री उशिरापर्यंत चालला. यादरम्यान CBI च्या पथकाने उपमुख्यमंत्र्यांच्या घरातून गुप्त कागदपत्रेही जप्त केली आहेत. यानंतर तपास यंत्रणेने सिसोदिया यांच्याविरोधात FIR ही नोंदवला. यामध्ये त्यांना मुख्य आरोपी म्हणून हजर करण्यात आले आहे. (FIR On Manish Sisodia)

 

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सिसोदिया यांचे नाव आघाडीवर आहे. उर्वरित आरोपींची नावे पुढे येत आहेत. अशावेळी मनीष सिसोदिया (FIR On Manish Sisodia) हेच तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे निश्चित केले आहे. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्याशिवाय तपास यंत्रणेने आणखी 14 जणांना आरोपी बनवले आहे.

 

CBI च्या FIR मध्ये आहेत ही नावे

1- मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, दिल्ली

2- आर्व गोपी कृष्णा, तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त

3- आनंद तिवारी, उत्पादन शुल्क उपायुक्त

4- पंकज भटनागर, सहायक उत्पादन शुल्क आयुक्त

5- विजय नय्यर, CEO, एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मुंबई

6- मनोज राय, माजी कर्मचारी, पेर्नोड रेकॉर्ड्स

7- अमनदीप ढाल, संचालक, ब्रिंडको सेल्स प्रायव्हेट लिमिटेड, महाराणी बाग

8- समीर महेंद्रू, व्यवस्थापकीय संचालक, इंडोस्पिरिट ग्रुप, जोरबाग

9- अमित अरोरा, बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, डिफेन्स कॉलनी

10- बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड

11- दिनेश अरोरा, गुजरावाला टाऊन, दिल्ली

12- महादेव लिकर, ओखला औद्योगिक क्षेत्र

13- सनी मारवाह, महादेव लिकर

14- अरुण रामचंद्र पिल्लई, बंगलोर, कर्नाटक

15- अर्जुन पांडे, गुरुग्राम फेज – 3, डीएलएफ

 

सीबीआय एफआयआरवरून काय समजते ?

सीबीआय एफआयआरमुळे हे प्रकरण अधिक मजबूत झाले आहे, ज्या लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे ते मनीष सिसोदिया यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. अमित अरोरा, दिनेश अरोरा आणि अर्जुन पांडे हे दारू  व्यापार्‍यांकडून कमिशन घेत असल्याचे एफआयआरमध्ये दिसून आले आहे. कमिशनच्या बदल्यात परवाना देण्यात आला. आता हे चौघेही मनीष सिसोदिया यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळेच त्यांच्या भूमिकेवर सीबीआयला शंका आहे.

 

सिसोदिया यांच्यावर कोणते दोन मोठे आरोप ?

या संपूर्ण प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर दोन मुख्य आरोप आहेत. पहिला आरोप असा की, Excise Department ने Liquor Shops साठी परवाने दिले, तेव्हा या कालावधीत मनीष सिसोदिया यांच्याकडून Private Vendors ना एकूण 144 कोटी 36 लाख रुपयांचा फायदा झाला. कारण या कालावधीत इतकी License Fee माफ करण्यात आली होती. त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले. याशिवाय मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता आणि उपराज्यपालांची अंतिम मंजुरी न घेता अनेक मोठे निर्णय घेतल्याचा आरोपही मनीष सिसोदिया यांच्यावर आहे.

 

CBI ने केले मोबाईल, कॉम्प्युटर जप्त

मनीष सिसोदिया यांच्यावर, कमिशन घेऊन जवळच्या दारू  व्यावसायिकांना परवाना दिल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या कारवाईमुळे मनीष सिसोदिया संतप्त झाले असून त्यांनी याबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सिसोदिया म्हणाले की, शुक्रवारी सकाळी सीबीआयची टीम आली होती, त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. माझा संगणक आणि वैयक्तिक मोबाईल जप्त करून घेऊन गेले आहेत.

मी आणि माझ्या कुटुंबीयांनी तपासात पूर्ण सहकार्य केले, अधिक तपास झाल्यास सहकार्य करू. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. सीबीआयचा गैरवापर होत आहे, सीबीआयवर, वरून नियंत्रण आहे, हे आपल्याला माहीत आहे. सीबीआयवर नियंत्रण ठेवून दिल्ली राज्य सरकारचे चांगले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वांना माहीत आहे.

 

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला घेरले

अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयच्या छाप्यावरुन ट्विट करत केंद्र सरकारला घेरले. केजरीवाल म्हणाले की, ज्या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृत्तपत्रात दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची प्रशंसा झाली, त्याच दिवशी सीबीआयला मनीषच्या घरी पाठवण्यात आले, मात्र आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू.

 

संजय सिंह यांनी छापेमारीवर उपस्थित केले प्रश्न

सिसोदिया यांच्या घरावरील छापेमारीवरून केजरीवाल यांच्याशिवाय संजय सिंह यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांची देशातील वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे संजय म्हणाले. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्या शिक्षण मॉडेलचे जगभर कौतुक होत असताना पंतप्रधान दिल्लीच्या शिक्षणमंत्र्यांवर सीबीआय छापे टाकत आहेत. या छाप्यामागे अबकारी धोरणाचा मुद्दा नाही, हा मुद्दा असता तर विषारी दारू बनवणार्‍या गुजरातमध्ये पहिला छापा टाकला असता, असा आरोप संजय यांनी केला.

 

अनुराग ठाकूर म्हणाले- घोटाळा नाही मग दारू धोरण मागे का ?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, दारूच्या ठेक्याचे प्रकरण आहे. मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क मंत्री आहेत. ज्या दिवशी तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला त्या दिवसापासून दारू धोरण मागे घेण्यात आल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. मुद्दा असा आहे की जर दारू धोरणात घोटाळा नव्हता तर ते मागे का घेतले ?

 

दिल्ली लुटणार्‍यांना जावे लागेल तुरुंगात : कपिल मिश्रा

दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, सत्येंद्र जैन यांचा भ्रष्टाचार पकडला गेला आहे, आता सिसोदिया यांचे घोटाळे जनतेसमोर येत आहेत. दारूच्या ठेक्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे प्रकरण ही तर सुरुवात आहे. केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा सुरू आहे. दिल्लीला लुटणार्‍यांना तुरुंगात जावे लागेल.

 

जुने धोरण आणि नवीन धोरणात काय फरक ?

या दारू घोटाळ्याचा वादग्रस्त मुद्दा सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल, तर आधी जुने धोरण समजून घेणे आवश्यक ठरते.
यापूर्वी दिल्ली सरकार दारू विक्रीच्या व्यवसायात पूर्णपणे गुंतले होते.
दिल्लीत सरकारची स्वत:ची दारूची दुकाने होती, ज्यावर उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण होते.
मात्र नवीन धोरणानुसार ही संपूर्ण रचनाच रद्द करण्यात आली.
दिल्ली सरकारने ठरवले की ते या व्यवसायाचा भाग नसून केवळ खाजगी कंपन्याच दिल्लीत दारू विकतील.

 

दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी

या अंतर्गत दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक झोनमध्ये 27 Private Vendors ना दारू विक्रीचा परवाना देण्यात आला आहे.
म्हणजेच या धोरणानुसार दिल्लीतील प्रत्येक प्रभागात दोन ते तीन दारू विक्रेते होते.
याशिवाय मनीष सिसोदिया यांच्या विभागाकडून या खासगी विक्रेत्यांना मोठ्या सवलतीवर दारू विकण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे.

 

Web Title : –  FIR On Manish Sisodia | delhi deputy cm manish sisodia cbi investigation fir accuse liquor scam new policy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा