FIR On Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध FIR, कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch Economic Offences Wing) भाजप (BJP) नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा (FIR On Mohit Kamboj) दाखल केला आहे. मोहित कंबोज यांच्या कंपनीने 52.08 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोहित कंबोज यांच्यासह कंपनीतील दोन संचालकांविरोधात देखील गुन्हा दाखल (FIR On Mohit Kamboj) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने मोहित कंबोज यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज (FIR On Mohit Kamboj) यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून (Indian Overseas Bank) 52 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. या बँकेची फसवणूक (Fraud) करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे.

 

दरम्यान, मोहित कंबोज यांनी स्वत: ट्विट करुन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू (EOW) मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन जर वाटत असेल की मी घाबरुन जाईल तर तसे नाही आहे. मी तथ्यांसह न्यायालयात जाईन.

 

याचबरोबर, मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, मुंबई माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बँक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असे वाटते की, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा (Nawab Malik) बदला असेल किंवा संजय राऊतांचा (Sanjay Raut), मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :- FIR On Mohit Kamboj | Mumbai Police Crime Branch economic offences
wing EoW registered case against bjp leader mohit kamboj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा