FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

पुणे : FIR On NCP Sachin Dodke | आमदार निधीमधून सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करुन कामगार व पेंटरांना मारहाण (Beating) करुन पेंटरचा कलर फेकून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके (Former Corporator Sachin Dodke) व त्याच्या कार्यकर्त्यांवर वारजे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस आणि बांधकाम व्यवसायिक वासुदेव शिवाजी भोसले BJP Vasudev Shivaji Bhosale (वय ४५, रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (११६/२३) दिली आहे. हा प्रकार वारजे येथील आर एमडी कॉलेज ते साई सयाजीनगरमधील अंडरपासमध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडला. (FIR On NCP Sachin Dodke)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वासुदेव भोसले यांचा बांधकाम व्यवसाय असून ते भाजपचे
सरचिटणीस आहेत. आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या आमदार निधीतून
आरएमडी कॉलेज (RMD College) येथील अंडरपास येथे काम चालू होते.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके व त्यांचे कार्यकर्ते जमले.
त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन “कोण ++++ येथे काम करतोय मी येथे काम करणार होतो,
कोण मला आडवतोय बघतो, त्याचे हात पाय तोडतो, तो कसा वारज्यात राहतोय बघतोच,” असे म्हणून
फिर्यादीस धमकी देण्यास सुरुवात केली. हातात बांबु घेऊन कामगार व पेंटर यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन पेंटरचा कलर फेकून देऊन नुकसान केले. पोलिसांनी सचिन दोडके, संजय दोडके व त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मुंढे (PSI Munde) तपास करीत आहेत.

Web Title :-FIR On NCP Sachin Dodke | Case filed against NCP’s Sachin Dodke; BJP general secretary was threatened and workers were beaten up

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | शिवसेना-धनुष्यबाणाचा वाद सुरू होता तेव्हा…, राज ठाकरेंचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य

Abdul Sattar | जळगावमध्ये ठाकरे गट आक्रमक, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर फेकले खोके अन् कापूस