home page top 1

गर्भपाताचे औषध ऑनलाईन विकले ; विक्रेता आणि ‘अ‍ॅमेझॉन’वर FIR दाखल 

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गर्भपाताची औषधे ऑनलाईन विकण्यास बंदी आहे. तसेच ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. असे असताना एका ऑनलाईन पोर्टलने गर्भपाताच्या औषधांची विक्रि करून ती घरपोच पाठविल्याने औषध विक्रेता आणि संबंधित अ‍ॅमेझॉनवर एफआरआय दाखल करण्यात आली आहे. एफडीएच्या औषध नियंत्रकाद्वारे ही तक्रार देण्यात आली आहे.

ऑनलाईन औषध विक्री बंदी असूनही विक्री होत आहे का, हे तपासण्यासाठी महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी काही दिवसांपूर्वी गर्भपाताच्या गोळ्यांसाठी ऑनलाईन ऑर्डर केली होती. ऑर्डर नोंदविल्यानंतर त्यांना गर्भपाताच्या गोळ्या घरपोच मिळाल्या. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कामोठे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. याबाबत पेणच्या अन्न आणि औषधे प्रशासनातील औषध नियंत्रक मुकुंद डोंगळीकर यांनी सांगितले की, ऑनलाईन औषधविक्री करणे बेकायदेशीर आहे. कामोठे पोलीस ठाण्यात या घटनेबाबत एफआयआर दाखल केली आहे. औषध विक्रेता आणि अ‍ॅमेझॉनवर कारवाई करण्यात आली आहे. ही औषधे उत्तर प्रदेशहून आल्यामुळे यासंदर्भातील पुढील तपास पोलीस करणार आहेत.

तर महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले की, मी अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन पोर्टलवरून गर्भपाताची जी औषधे मागवली होती ती स्त्रीरोग तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येत नाहीत. परंतु, मला ही औषधे कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळाली आहेत. यासंदर्भात एफडीए अधिकाऱ्यांनी कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Loading...
You might also like