हडपसरमध्ये मास्क न वापरणाऱ्यावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  हडपसर गाडीतळ येथील डी.पी. रस्त्यावर मास्क न घालता पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी घडली.

पोलिसांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हडपसर गाडीतळ येथील (डी. पी. रोड) संजीवनी हॉस्पिटल येथे रस्त्यावर गर्दी करू नका, सहकार्य करा, घरात थांबा असे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे संजय जाधव, महिला पोलीस कर्मचारी मोरे आणि पठाण सांगत होते. यावेळी मास्क न घातलेल्या कुलकर्णी नामक नागरिकाने सहकार्य करण्याऐवजी महिला पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करून हुल्लडबाजी करीत गैरवर्तन केले. त्यामुळे त्याच्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा फैलाव करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी महिला पोलीस मोरे आणि पठाण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.